बंगळूरला आजपासून ‘एरो इंडिया’

पीटीआय
Wednesday, 3 February 2021

बंगळूर येथे आजपासून (ता. ३) एरो इंडिया शो सुरू होत असून तो तीन दिवस चालणार आहे. आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाला बुस्ट देण्यासाठी एरो इंडिया शो महत्त्वाचा ठरणार आहे.

बंगळूर - चित्तथरारक हवाई कवायतींनी उद्यापासून बंगळूर शहर रोमांचित होणार आहे. भारताची संरक्षण सिद्धता, सामर्थ्याचे दर्शन घडवणाऱ्या एरो इंडिया शोवर कोविडचेही सावट आहे. बंगळूर येथे आजपासून (ता. ३) एरो इंडिया शो सुरू होत असून तो तीन दिवस चालणार आहे. आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाला बुस्ट देण्यासाठी एरो इंडिया शो महत्त्वाचा ठरणार आहे. कोविडमुळे प्रदर्शन पाहणाऱ्या श्रोत्यांच्या संख्येवर मर्यादा आणली असून दररोज केवळ ३ हजार नागरिकांना कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बंगळूरच्या येलहंका हवाई दलाच्या स्थानकावर १३ व्या एरो इंडिया-२०२१ चे आयोजन होत आहे. भारताचे संरक्षण तंत्रज्ञान आणि सामर्थ्याचे प्रदर्शन घडवणारा एरो शो यंदा वैशिष्ट्‌येपूर्ण असणार आहे. यावेळी पहिल्यांदाच स्वदेशी क्रुझ क्षेपणास्त्र ‘निर्भय’चा प्रदर्शनात सहभाग करण्यात आला आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमीटेड (एचएएल) च्या वतीने आयोजित केलेल्या प्रदर्शनात संरक्षण आणि हवाई दल आपल्या कौशल्याचे सादरीकरण करणार आहे. डीआरडीओ देखील एरो शोच्या माध्यमातून सुमारे ३०० उत्पादने आणि तंत्रज्ञान जगासमोर आणणार आहे. या प्रदर्शनातून भारत जगाला आपल्या हवाई आणि संरक्षण सामर्थ्याचे दर्शन घडवणार आहे. सध्या कोविडच्या प्रादुर्भावामुळे प्रदर्शनाला मर्यादा आल्याने काही बदल केले आहेत. दररोज तीन हजार नागरिकांना प्रवेश दिला जाणार असून त्यांच्याकडे ३१ जानेवारीपर्यंतचा कोविड चाचणी अहवाल असणे बंधनकारक आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aero India to Bangalore from today