esakal | अफगाणिस्तान संकट: अजित डोवाल यांनी रशिया समोर स्पष्ट केली भारताची भूमिका
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Doval

अफगाणिस्तान संकट: अजित डोवाल यांनी रशिया समोर स्पष्ट केली भारताची भूमिका

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: रशियन एनएसए निकोले पात्रुशेव (Nikolay Patrushev) यांनी काल भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (nsa ajit doval) यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही देशाच्या एनएसएमध्ये अफगाणिस्तानातील (Afganistan) सध्याची परिस्थिती आणि पाकिस्तानचे (pakistan) दहशतवादी संघटनांबरोबर असलेल्या संबंधांवर चर्चा झाली. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मदसह भारताने अफगाणिस्तानात ज्या दहशतवादी गटांवर लक्ष केंद्रीय केलेय, त्यांच्याबरोबर पाकिस्तानच्या आयएसआयचे कसे संबंध आहेत, त्याची माहिती रशियन एनएसएना देण्यात आली.

बहुतांश विषयांवर दोन्हीबाजुंमध्ये एकमत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. अफगाणिस्तानच्या भूमीचा दहशतवाद पसरवण्यासाठी तसेच भारताविरोधात वापर होऊ न देण्याची पाकिस्तानवर विशेष जबाबदारी असल्याचे एनएसएस डोवाल यांनी निकोले पात्रुशेव यांना सांगितलं. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांनी अन्य देशांवर हल्ले करण्यासाठी अफगाणिस्तानचा वापर करु नये, हे आपले मुख्य उद्दिष्टय असल्याचे भारताने आधीच स्पष्ट केलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: 'त्या' महिलेचा सचिन वाजे ग्राहक होता, महिन्याला देत होता ५० हजार

अफगाणिस्तानातील मानवीय आणि स्थलांतराच्या समस्येवर चर्चा झाल्याचे रशियाकडून सांगण्यात आले. अफगाणिस्तानात शांतता नांदण्यासाठी भारत-रशियाला मिळून संयुक्तपणे काय प्रयत्न करता येतील, यावरही चर्चा झाली. ब्रिक्स परिषदेच्या एक दिवस आधी अफगाणिस्तानच्या विषयावर ही बैठक झाली.

loading image
go to top