esakal | 'त्या' महिलेचा सचिन वाजे ग्राहक होता, महिन्याला देत होता ५० हजार
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin waze

'त्या' महिलेचा सचिन वाजे ग्राहक होता, महिन्याला देत होता ५० हजार

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: सचिन वाजेसोबत (Sachin waze) फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाताना दिसलेल्या महिलेचं गुढ अखेर उकललं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने (NIA) दाखल केलेल्या आरोपपत्रातून या महिलेबद्दलची माहिती समोर आलीय. अँटिलिया स्फोटक प्रकरण (Antilia bomb scare) आणि मन्सुख हिरेन हत्या प्रकरणात (Mansukh Hiran murder case) मुख्य आरोपी असलेला सचिन वाजे सध्या तुरुंगात आहे. सचिन वाजे या महिलेचा ग्राहक होता. मागच्यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून सचिन वाजे या महिलेला खर्चासाठी म्हणून महिन्याला ५० हजार रुपये देत होता.

सचिन वाजेने या महिलेला त्याने स्थापन केलेल्या एका कंपनीचे संचालकही बनवले होते. या कंपनीच्या खात्यात १.२५ कोटी रुपये कुठून आले? त्या पैशांचा स्त्रोत काय होता? ते माहित नसल्याचे या महिलेने NIA अधिकाऱ्यांना चौकशीत सांगितले. सचिन वाजेला सर्वप्रथम आपण २०११ साली भेटल्याचे महिलेने तिच्या जबानीत म्हटले आहे. जून २०२० मध्ये पोलीस दलता रुजू झाल्यानंतर वाजेने चांगले उत्पन्न मिळत असल्याने या महिलेला एस्कॉर्ट म्हणून काम थांबवायला सांगितले, असे या महिलेने तिच्या जबानीत सांगितले. मिड डे ने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: टीम इंडियातील सात खेळाडूंचा पहिला T20 वर्ल्ड कप

"मी एस्कॉर्ट म्हणून काम थांबवलं. सचिनने ऑगस्ट २०२० पासून खर्चासाठी म्हणून दर महिन्याला मला ५० हजार रुपये द्यायला सुरुवात केली" असे तिने सांगितले. नियमित उत्पन्नासाठी दोन मालकीच्या कंपन्या सुरु करण्याचाही वाजेने या महिलेला सल्ला दिला. वाजेने ५० हजार वगळता अन्य रक्कम कधीही दिली नाही, असे या महिलेने तपास यंत्रणेला सांगितले. पण सचिन वाझे बिझनेससाठी म्हणून या महिलेची बँक खाती वापरत होता.

हेही वाचा: ICC T20 World Cup : टीम इंडियाची घोषणा, असा आहे संघ

तिच्या बचत खात्यात किंवा कंपनीच्या करंट अकाऊंटमध्ये तो पैसे वळवायचा. मुंबईच्या फाईव्ह स्टार हॉटेलमधल्या सीसीटीव्ही फुटेजबद्दल विचारल्यानंतर तिने सांगितले की, "१८ आणि १९ फेब्रुवारीला सचिन वाजेने आपल्याला ४० लाख आणि ३६ लाख रुपयाच्या नोटा मोजण्यासाठी दिल्या होत्या" मयांक ऑटोमाटायन या कंपनीच्या करंट अकाऊंटमध्ये १.२५ कोटी रुपये जमा झाले होते. त्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर त्या महिलेने हे पैसे खात्यात का जमा करण्यात आले? त्याची कल्पना नसल्याचे उत्तर दिले.

loading image
go to top