esakal | अफगाणिस्तानचा वापर ध्रुवीकरणासाठी नको; अभ्यासकांचं मोदी सरकारला आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

अफगाणिस्तानचा वापर ध्रुवीकरणासाठी नको; अभ्यासकांचं मोदी सरकारला आवाहन

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : अफगाणिस्तानातील स्थितीवर चिंता व्यक्त करताना देशातील आघाडीच्या तज्ज्ञांचा समावेश असलेल्या गटाने केंद्र सरकारला उद्देशून एक निवेदन प्रसिद्ध केले असून यात ताज्या घटनाक्रमाचा देशातील ध्रुवीकरणासाठी वापर होऊ देता कामा नये असे म्हटले आहे. माजी केंद्रीयमंत्री के. नटवरसिंग, यशवंत सिन्हा आणि मणिशंकर अय्यर आदी दिग्गजांचा या गटात समावेश आहे. केंद्र सरकारने सातत्याने तालिबानशी चर्चा करावी पण देशातील कोणत्याही राजकीय पक्षाने याचा ध्रुवीकरणासाठी वापर करू नये म्हणून दक्षता घ्यावी असे या निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा: मोदी सरकारची जाहिरातबाजी! खर्च केलेत तब्बल 'इतके' हजार कोटी

‘इंडियन फ्रेंड्स ऑफ अफगाणिस्तान’ या संघटनेने याबाबतचे निवदेन प्रसिद्ध केले असून त्यात अफगाणी नागरिकांना शांतता आणि राष्ट्राची फेरउभारणी हवी असून भारत त्यांच्यासोबत ठामपणे उभा असल्याचे म्हटले आहे. या संकटाच्या काळात भारतातील लोकांनी अफगाणी नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणे गरजेचे आहे. आतापर्यंत प्रत्येक आक्रमकांना सडेतोड उत्तर देणारे अफगाणी नागरिक दहशतवादाविरोधातील लढाई देखील तितक्याच ताकदीने लढतील असा विश्‍वास त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला. हे निवेदनावर निवृत्त आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरो, माजी आयएएस अधिकारी आणि जामिया मिलियाचे माजी कुलगुरू नजीब जंग, अफगाणिस्तानबाबतचे तज्ज्ञ वेदप्रताप वैदिक, ज्येष्ठ पत्रकार सईद नक्वी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

हेही वाचा: राहुल गांधींच्या GDPच्या व्याख्येला भाजपचं CNPने उत्तर

आश्रय देताना सापत्न वागणूक नको
भारताने तालिबानसोबत चर्चा केल्याबद्दल केंद्र सरकारचे स्वागत करताना या मान्यवरांनी भविष्यात देखील अशाच पद्धतीने चर्चा करण्यात यावी अशी मागणी केली आहे. अफगाणी नागरिकांना भारतामध्ये आश्रय देताना सापत्न वागणूक देण्यात येऊ नये. अफगाणिस्तानातील पत्रकार, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना देशात राहण्याची परवानगी दिली जावी असेही या निवेदनात म्हटले आहे.

loading image
go to top