esakal | राहुल गांधींच्या GDPच्या व्याख्येला भाजपचं CNPने उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Sambit Patra criticizes Rahul Gandhi

राहुल गांधींच्या GDPच्या व्याख्येला भाजपचं CNPने उत्तर

sakal_logo
By
सुधीर काकडे

कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज पत्रकार परिषद घेत इंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकावर टीका केली. पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किंमती वाढवून सरकारने मोठी कमाई केली. तरीही देशाच्या मालमत्ता विकल्या जात आहेत, त्यामुळं कमाईचा पैसा नक्की जातोय कुठं? असा सवाल राहुल गांधी यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी राहुल गांधींनी गॅस, पेट्रोल, गॅस अशी जीडीपीची व्याख्या केली होती. त्यानंतर आता भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबीत पात्रा (Sambit Patra) यांनी राहुल गांधी यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी बोलताना संबीत पात्रा यांनी राहुल गांधी हे त्यांना ज्ञान नसलेल्या विषयावर भाष्य करत असून, त्यांनी चुकीच्या पद्धतिने जीडीपीची (GDP) अर्थ सांगत असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी कॉंग्रेसने केलेल्या GDPच्या आरोपाला CNPने उत्तर दिले आहे. कॉंग्रेसने आपल्या काळात करप्शन, नेपोटीझम आणि पॉलिसी पॅरालिसीसच्या आधारावर काम केल्याचा आरोप यावेळी संबीत पात्रा यांनी केला आहे.

हेही वाचा: जनतेकडून पैसा काढून खास लोकांना दिला जातोय - राहुल गांधी

राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आरोप करताना, देशातील जनतेकडून पैसा काढून घेतला जातोय आणि तो विशिष्ट लोकांना दिला जातोय, असा हल्लाबोल केला. तसेच पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किंमती वाढवून सरकार मोठी कमाई केली असा आरोप करताना जीडीपी म्हणजे गॅस-डिझेल पेट्रोल अशी टीका केली. यावर प्रत्युत्तर देताना संबीत पात्रा यांनी कॉंग्रेस सरकार सीएनपी (CNP) अर्थात करप्शन, नेपोटीझम आणि पॉलिसी पॅरालिसीस वर काम करत होते, त्यामुळे त्यांना खऱ्या जीडीपीचा अर्थ समजत नसल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, केंद्र सरकारवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, गेल्या सात वर्षात आपण नवा आर्थिक नमुना पाहिला आहे. एकिकडे नोटाबंदी तर दुसरीकडे पैसे वाटपाचं काम सुरु आहे. सुरुवातीला मोदींनी म्हटलं होतं की, मी नोटाबंदी करतोय नंतर अर्थमंत्री म्हणाले की, आपण कमाई करत आहोत. आता लोक विचार आहेत की कमाईच्या नावाखाली काय सुरु आहे. मग नोटाबंदी नक्की कशासाठी करण्यात आली आहे. शेतकरी, कामगार, छोटे आणि मध्यम व्यावसायिक, पगारी वर्ग, सरकारी कर्मचारी आणि प्रामाणिक उद्योगपती यांच्यावर नोटाबंदी लादून पैसा काढून घेण्यात आला आहे. हा काढून घेतलेल्या पैशातून नक्की कोणाची कमाई होत आहे? मोदींच्या ४-५ मित्रांची? असा सवालही यावेळी राहुल गांधी यांनी केला.

loading image
go to top