Shraddha Murder Case : "मला वाचव, तो मला मारुन टाकेल"; श्रद्धाचं मृत्यूपूर्वीचं मित्रासोबतचं चॅट समोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shraddha Walker
Aftab Poonawala Case : मला वाचव, तो मला मारुन टाकेल; श्रद्धाचं मृत्यूपूर्वीचं मित्रासोबतचं चॅट समोर

Shraddha Murder Case : "मला वाचव, तो मला मारुन टाकेल"; श्रद्धाचं मृत्यूपूर्वीचं मित्रासोबतचं चॅट समोर

वसईतल्या एका तरुणीची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे जंगलात टाकल्याची भीषण घटना सध्या चर्चेत आहे. श्रद्धा वालेकर असं या तरुणीचं नाव असून ती आफताब नावाच्या तिच्याच प्रियकराने तिचा खून केला आहे. आपल्या जीवाला धोका असल्याचा अंदाज श्रद्धाला आधीच आला होता, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.

हेही वाचा: Delhi Murder Case: Dating App, लिव्ह इन.. शेवटी ३५ तुकडे; वसईच्या तरुणीच्या हत्येचा असा झाला उलगडा

नक्की काय आहे हा प्रकार?

श्रद्धा वालकर या वसईतल्या २६ वर्षीय तरुणीची तिच्या प्रियकराने दिल्लीमध्ये निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले आणि ते तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर तो जंगलातल्या वेगवेगळ्या भागांत हे तुकडे फेकून देत होता. आफताब आमीन पूनावाला असं तिच्या प्रियकराचं नाव असून श्रद्धाने आफताबकडे लग्नाचा तगादा लावल्याने तिची हत्या केल्याचं पोलीस तपासांत आढळून आलं आहे.

हेही वाचा - मामाच्या जमिनीवरून सावकाराला पळविणारा 'डेबू' कसा बनला गाडगेबाबा.....

पोलिसांनी या आरोपीला अटक केली असून आता या हत्याकांडाविषयी आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे. श्रद्धाला आपल्या जीवाला धोका असल्याची कुणकूण आधीच लागली होती आणि तिने याबद्दल आपल्या एका मित्राला मेसेज केल्याचंही आढळून आलं आहे. श्रद्धाचा मित्र लक्ष्मणने श्रद्धाबद्दल तिच्या कुटुंबाला सांगितलं होतं. श्रद्धाची सप्टेंबरपासून कोणालाही काहीही माहिती नव्हती. मात्र श्रद्धाने आपल्याला व्हॉटसपवरुन आपल्या अडचणी सांगितल्याचं लक्ष्मणने सांगितलं. तो म्हणाला, "एकदा श्रद्धाने मला व्हॉटसपवर मेसेद केला होता. त्या दोघांमध्ये सारखे वाद व्हायचे. त्यावेळी तिने माझी या घरातून सुटका कर, अशी विनंती मला केली होती. तसंच मी आज रात्री याच्याबरोबर थांबले तर तो मला मारुन टाकेल, असंही सांगितलं होतं."

हेही वाचा: Delhi Crime: 'लिव्ह इन रिलेशनशिप'चा असाही शेवट; प्रेताचे तुकडे करुन केलं 'हे' क्रूर कृत्य

लक्ष्मणने त्यावेळी श्रद्धाच्या घरी जाऊन आफताबला पोलिसांची धमकीही दिली. पण श्रद्धाने पोलिसांकडे जाण्यापासून अडवल्याने आपण पोलिसांत गेलो नाही, असं लक्ष्मणने सांगितलं. तिने मेसेजला रिप्लाय करणं थांबवलं आणि मग आपल्याला तिची चिंता वाटू लागली. म्हणून आपण तिची चौकशी करायला सुरुवात केल्याचंही लक्ष्मणने सांगितलं. त्याने याविषयी तिच्या भावालाही कळवलं होतं.

टॅग्स :crimeCrime Against Woman