Delhi Crime: 'लिव्ह इन रिलेशनशिप'चा असाही शेवट; प्रेताचे तुकडे करुन केलं 'हे' क्रूर कृत्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

delhi crime

Delhi Crime: 'लिव्ह इन रिलेशनशिप'चा असाही शेवट; प्रेताचे तुकडे करुन केलं 'हे' क्रूर कृत्य

नवी दिल्लीः तब्बल पाच महिन्यांनतर दिल्ली पोलिसांनी एका खुनाचा छडा लावला आहे. या गंभीर घटनेमध्ये एका तरुणाने प्रेयसीचा खून करुन तिच्या शरीराचे तुकडे केले. ते तुकडे एकेक करुन ते तुकडे जंगलामध्ये फेकले.

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, आफताब अमीन पुनावाला नावाच्या विवाहित व्यक्तीने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. दोघेही कॉल सेंटरमध्ये काम करत होते. तिने जेव्हा लग्न करण्यासाठी त्याच्यावर दबाव आणला. तेव्हा त्याने तिला मुंबईत आणलं, तिचा खून केला. तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन जंगलामध्ये फेकून दिले.

घटनेच्या पाच महिन्यानंतर पोलिसांनी आरोपी आफताब अमीन पूनावाला याला अटक केली आहे. मृत तरुणीच्या वडिलांनी ८ नोव्हेंबर रोजी मुलीच्या अपहरणाची तक्रार दिल्लीतल्या महरौली ठाण्यात दिली होती.

मृत तरुणीचे आईवडील महाराष्ट्रातील आहेत. या दोघांच्या लिव्ह इन रिलेशनच्या नात्याला घरातून विरोध होत होता. ते दोघे मुंबईमध्ये राहात होते. परंतु अनेक दिवसांपासून मुलीचा संपर्क होत नसल्याने मृत तरुणीच्या आई-वडिलांनी पोलिसात तक्रार दिली. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे.

आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी

आरोपी आफताब अमीन पूनावाला याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान आरोपीने प्रेयसीचे ३५ तुकडे केल्यानंतर ते ठेवण्यासाठी फ्रिज खरेदी केल्याची माहिती आहे. तब्बल १८ दिवस तो ते तुकडे जंगलामध्ये फेकून द्यायचा. सध्या तो दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे.

टॅग्स :crimedelhiMumbai