'पंतप्रधान मोदी युगपुरुष आणि तपस्वी,देश २०१४ मध्ये पुन्हा स्वातंत्र्य झाला'

भारताला २०१४ मध्ये मोदीजींचे सरकार बनल्यानंतर पुन्हा स्वातंत्र्य मिळाले.
Narendra Modi And Shwait Malik
Narendra Modi And Shwait Malikesakal

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार श्वेत मलिक (Shwait Malik) बुधवारी (ता.दोन) म्हणाले, की देशाला भले १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. मात्र खरे पाहाता २०१४ मध्ये नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे पंतप्रधान बनल्यानंतर देशाला पुन्हा स्वातंत्र्य मिळाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाचे अनुमोदन देताना मलिक यांनी केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या यशाच्या टप्प्यांचा उल्लेख करित पंतप्रधान मोदींना युगपुरुष आणि तपस्वीही म्हटले.पंतप्रधानांचे कौतुक करताना एक शेर म्हटल्यानंतर मलिक म्हणाले, जेव्हा भारत (India) स्वातंत्र्य झाला, तेव्हा काँग्रेसमुळे आपला देश भ्रष्टाचारयुक्त झाला आणि देश आश्रित बनला. या कारणामुळे जे खरे स्वातंत्र्य होते ते आपल्याला मिळाले नाही. मी तर म्हणाले, की खरे पाहाता आपल्या देशाला २०१४ मध्ये मोदीजींचे सरकार बनल्यानंतर पुन्हा स्वातंत्र मिळाले आहे. (After 2014 Due To Modi India Again Get Freedom, Said BJP MP Shwait Malik)

Narendra Modi And Shwait Malik
पाकिस्तानमध्ये लष्कारावर मोठा दहशतवादी हल्ला, चार दहशतवादी ठार

ते म्हणाले, की राष्ट्रपतींनी मोदी सरकारचे यश पाहाता विश्वास व्यक्त केला की २०४७ मध्ये जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील, तोपर्यंत पंतप्रधानांच्या हातातून आधुनिक भारत आणि विकसित भारताचे स्वप्न पूर्ण झालेले असेल. त्यांनी दावा केला, पंतप्रधान मोदींचे सरकार दीर्घकाळ राहिल. त्यानंतर हा देश वैभवाच्या शिखरावर पोहोचेल, जागतिक शक्ती आणि विश्वगुरु बनेल. मलिक म्हणाले, मागील सरकारच्या काळात जो भ्रष्टाचार झाला होता. त्यामुळे देशातील लोकांनी २०१४ मध्ये खूप मोठा बदल घडवून आणला. अगोदर मोदीजींनी नारा दिला होता, की अच्छे दिन येतील, तर २०१४ मध्ये आमच्या विरोधी पक्षांमधील मित्रांना हसू आले होते.

Narendra Modi And Shwait Malik
आमच्या सरकारमुळे गरीब लक्षाधीश ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

परंतु २०१९ च्या निवडणुकीचा (Lok Sabha Election 2019) जो निकाल आला, त्यात आमच्या सरकारला पूर्ण बहुमत मिळाले. त्याने सिद्ध केले की देशात अच्छे दिन आले आहेत. ते म्हणाले, की त्या निवडणुकीनंतर २०२० मध्ये पंतप्रधान मोदींनी देशाला आत्मनिर्भर बनवण्याचा नारा दिला आणि आज १३० कोटी देशवासी राजकारणाच्यावर धर्म, जात आणि संप्रदाय बाजूला ठेवून खांद्याखांदा लावून चालत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com