esakal | कोरोनावरील लस घेतल्यानंतर 5 गोष्टी टाळा; साईड इफेक्ट्सबाबत WHO ने काय सांगितलं?
sakal

बोलून बातमी शोधा

corona

देशात कोरोना लसीकरणाची सुरुवात झाली आहे. सुरुवातील आरोग्य कर्मचारी आणि ६० वर्ष वयांपुढील व्यक्तींना कोरोनावरील लस देण्यात आली आहे.

कोरोनावरील लस घेतल्यानंतर 5 गोष्टी टाळा; साईड इफेक्ट्सबाबत WHO ने काय सांगितलं?

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- देशात कोरोना लसीकरणाची सुरुवात झाली आहे. सुरुवातील आरोग्य कर्मचारी आणि ६० वर्ष वयांपुढील व्यक्तींना कोरोनावरील लस देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात ४५ वर्षे वयापुढील सर्व व्यक्तींना कोरोनावरील लस दिली जात आहे. अशात जागतिक आरोग्य संघटनेने लसीकरणासंबंधी एक पब्लिक डॉक्युमेंट जारी केला आहे. यामध्ये लस घेतल्यानंतर काही साईड इफेक्ट दिसून येणे सामान्य गोष्ट असल्याचं सांगण्यात आलंय. कोरोना लशीचे सामान्य साईड इफेक्ट्स आणि लॉंग टर्म साईड इफेक्ट्स संबंधातही जागतिक आरोग्य संघटनेने माहिती दिली आहे. दुसरीकडे, काही तज्ज्ञांनी कोरोनावरील लस घेतल्यानंतर काही दिवस काही गोष्टी टाळण्यास सांगतिलं आहे. WHO ने सांगितलंय की लस घेतल्यानंतर सौम्य ताप, मासंपेशीमध्ये त्रास जाणवू शकतो.  असे होत असल्यास घाबरण्याचे कारण नाही. WHO नुसार, सौम्य साईड इफेक्ट्समधून असे संकेत मिळतात की, तुमची इम्युन सिस्टम लशीला प्रतिक्रिया देत आहे. काही दिवसांनंतर हे साईड इफेक्ट्स निघून जातात. लस टोचल्याजागी दुखणे, थकवा, डोकेदुखी, जुलाब असे साईड इफेक्ट्स सौम्य आहेत. 

काही प्रकरणात लस घेतल्यानंतर दुर्मिळ साईड इफेक्ट्स पाहायला मिळू शकतात. यामध्ये अॅलर्जिक रिअॅक्शन दिसू शकतात. मेडिकल एक्सपर्टनुसार, कोविड लस घेतल्यानंतर काही दिवसांपर्यंत टॅटू काढून घेऊ नये. यामुळे इम्युन रिस्पॉन्स ट्रिगर होऊ शकते. त्यामुळे लस घेतल्यानंतर काही दिवस टॅटू काढून घेऊ नका.  वैज्ञानिकांनुसार, कोविडवरील लस घेण्याआधी दोन आठवडे आधी किंवा नंतर इतर कोणतीही लस घेऊ नका. 

प्रियांका गांधी होम क्वारंटाइन; रॉबर्ट वाड्रांना कोरोनाची लागण

लस घेतल्यानंतर काही दिवस व्यायाम करणे टाळा. तुमच्या मांसपेशींमध्ये त्रास जाणवत असेल, तर व्यायाम टाळलेलाच बरा. लस घेतल्यानंतर तुम्ही दोन दिवस ब्रेक घेऊ शकता. लस घेतल्यानंतर शरीराला हायड्रेटेड ठेवणे गरजेचं आहे. त्यामुळे पाणी जास्त प्रमाणात प्या. तुम्हाला लस घेतल्यानंतर ताप आला असेल जर जास्त पाणी पिणे फायद्याचे ठरु शकते.  कोरोना लस घेतल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं जातं. ते जपून ठेवा, कारण भविष्यात तुम्हाला ते कामाला येऊ शकते.