esakal | Lakhimpur I विमानतळावरील ड्राम्यानंतर राहुल गांधींची सुटका, लखीमपूरसाठी रवाना
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi,

विमानतळावरील ड्राम्यानंतर राहुल गांधींची सुटका, लखीमपूरसाठी रवाना

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे पीडित शेतकऱ्यांच्या भेटीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या काँग्रेसच्या शिष्टमंडळाला लखनऊ विमानतळावरच अडवण्यात आलं होतं. या ठिकाणी काही काळ ड्रामा झाल्यानंतर त्यांना पुढे जाण्यास परवानगी देण्यात आली, त्यानंतर ते लखीमपूरकडे रवाना झाले आहेत.

योगी सरकारनं परवानगी दिली असतानाही आपल्याला अडवण्यात आलं आहे, असं राहुल गांधी यांनी विमानतळावर म्हटलं, तसेच सरकारनं दिलेली ही कसली परवानगी? असा सवाल त्यांनी विचारला होता. एएनआयनं प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओनुसार, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या काँग्रेस नेत्यांच्या पथकाला पोलीस कर्मचारी अडवताना दिसत आहेत. यावेळी माध्यमांसमोर राहुल गांधी त्यांना आम्हाला परवानगी असतानाही तुम्ही कुठल्या नियमांतर्गत आम्हाला रोखत आहात असं विचारताना दिसत आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी विमानतळावर ठिय्याही मांडला.

या भेटीसाठी राहुल गांधी यांच्यासोबत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी हे देखील आहेत. राहुल गांधी सुरुवातीला सीतापूर येथे प्रियांका गांधी यांना अटक करुन जिथं ठेवण्यात आलं आहे, त्या ठिकाणी भेट देणार आहेत. त्यांनतर ते लखीमपूरसाठी रवाना होणार आहेत.

loading image
go to top