लोकसभेनंतर आता राज्यसभेतील 45 खासदारांचे निलंबन; आतापर्यंत 92 सदस्य आऊट

संसदेत गोंधळ घातल्याप्रकरणी सदस्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे. काही वेळापूर्वी लोकसभेतील ३३ खासदारांचे निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर आता राज्यसभेतील ४५ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.
34 MPs of Rajya Sabha
34 MPs of Rajya Sabha
Updated on

नवी दिल्ली- संसदेत गोंधळ घातल्याप्रकरणी सदस्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे. काही वेळापूर्वी लोकसभेतील ३३ खासदारांचे निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर आता राज्यसभेतील ४५ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीपर्यंत सदस्यांचे निलंबन कायम राहील. आज दिवसभरात ७८ खासदारांचे निलंबन झाले आहे. ( After Lok Sabha now 34 MPs of Rajya Sabha suspended for remainder of Winter Session disrupting Parliament proceedings)

सोमवारी राज्यसभेचे कामकाज सुरु झाल्यापासून तीनवेळा राज्यसभा स्थगित करण्यात आली. संसदेत झालेल्या सुरक्षेच्या चूकीबाबत विरोधक आक्रमक झाले आहेत. याप्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन सादर करावं अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. आक्रमक होऊन गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीये.

34 MPs of Rajya Sabha
MLA Disqualification : ...तर शिवसेनेच्या सर्वच आमदारांचे निलंबन करावे लागेल; सुनावणीदरम्यान ठाकरे गटाने मांडला अत्यंत महत्वाचा मुद्दा

राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनकर म्हणाले की, 'मी सन्मानीय खासदारांना विनंती करतो की त्यांनी सभागृहाच्या नियमांनुसार वागावं. सभागृहाच्या कामकाजादरम्यान गोंधळ घालू नका. सभागृहाची प्रतिष्ठा मातीत मिळवण्याचं काम करु नका.' अध्यक्षांच्या विनंतीनंतरही खासदारांनी गोंधळ सुरुच ठेवला. त्यानंतर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे.

34 MPs of Rajya Sabha
MP Suspended: विरोधी पक्षाच्या 33 खासदारांचे निलंबन; आतापर्यंत 47 जणांवर कारवाई

विशेष म्हणजे आज लोकसभेच्या ३३ खासदारांचे निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर आता राज्यसभेतही खासदारांवर कारवाई करण्यात आली आहे. राज्यसभेतील ४५ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि राज्यसभा मिळून आतापर्यंत ९२ खासदारांचे निलंबन झालं आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com