
श्रीमंताच्या यादीत मुकेश अंबानींची घसरण; गौतम अदानी अव्वल स्थानी
गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये सातत्याने होणाऱ्या पडझडीचा फटका रिलायन्स (Reliance) समुहाला बसला आहे. त्यामुळे मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) संपत्तीत घट झाली असून भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीतील अव्वल स्थानही त्यांना गमवावं लागले. गौतम अदानी (Gautam Adani) हे आता भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अव्वलस्थानी आले आहेत. (After Mukesh Ambani, Gautam Adani has topped the list of richest people in India)
फोर्ब्सच्या (Forbs) रिअल टाइम नेट वर्थ डेटानुसार, अदानी यांची मालमत्ता सध्या सुमारे 6.72 लाख कोटी रुपये आहे. त्याचबरोबर मुकेश अंबानी यांची संपत्ती 6.71 लाख कोटी रुपये आहे. याशिवाय गौतम अदानी हे सध्या जागतिक स्तरावर जगातील 11 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.
आकडेवारीनुसार, 31 डिसेंबर 2021 पर्यंत अदानीची मालमत्ता 5.82 लाख कोटी रुपये होती. 18 जानेवारीला ती वाढून 6.95 लाख कोटी रुपये झाली होती. त्यानुसार 2022 मध्ये अदानीच्या एकूण मालमत्तेत दररोज 6000 कोटी रुपयांची वाढ होत आहे.
Web Title: After Mukesh Ambani Gautam Adani Has Topped The List Of Richest People In India
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..