After Rahul Gandhis intervention Congress willing to give Sachin Pilot another chance
After Rahul Gandhis intervention Congress willing to give Sachin Pilot another chance

राहुल गांधी म्हणतात; सचिन पायलट यांना पक्षाने एक संधी द्यायला हवी

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजस्थानचे बंडखोर काँग्रेस नेते सचिन पायलट यांना काँग्रेसची दारे खुली असल्याचे म्हटले आहे. सचिन पायलट यांना काँग्रेस पक्षाने एक संधी द्यायला हरकत नसल्याचे म्हणत त्यांनी राजस्थानमध्ये चालू असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. याबाबतचे वृत्त टाईम्स नाऊने दिले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

राजस्थानमध्ये उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावर कारवाई करत काँग्रेसने पायलट यांची उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली होती. त्यांनंतर पायलट हे भाजपशी हातमिळवणी करण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केले असून आता सचिन पायलट पुढे काय निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यादेखिल सचिन पायलट यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, सचिन पायलट यांनी आपल्याला ३० आमदारांचा पाठिंबा असून अशोक गेहलोत सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला होता. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षातही प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सचिन पायलट यांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दुसरीकडे काँग्रेसनेही १०९ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात मात्र, त्यांच्याकडे ९० आमदारांचाच पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. राजस्थान विधानसभेत १०७ एवढे संख्याबळ असलेल्या काँग्रेसला १३ अपक्षांसह भारतीय ट्रायबल पार्टीच्या दोन आणि राष्ट्रीय लोक दलाच्या एका आमदाराचा पाठिंबा आहे. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दोन आमदारांनी काँग्रेसला बाहेरून पाठिंबा दिला आहे. काँग्रेसच्या दोन तृतीयांश म्हणजे १०७ पैकी ७२ आमदारांनी पक्षांतर केले, तर ते पक्षांतरबंदी कायद्यापासून वाचू शकतात. परंतु, एवढ्या मोठ्या संख्येने काँग्रेसचे आमदार फुटणे अशक्य असल्याचे मानले जात असल्याने तूर्तास पायलट हे भाजपमध्ये प्रवेश करणार नसले तरी काय भूमिका घेणार याकडे मात्र राजकिय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com