WHO नं आशांची दखल घेतली पण आपल्या सरकारने नाही...काय आहे आशा वर्कर प्रकल्प

आशा Ray of Hope
Aasha worker  on field
Aasha worker on field E sakal

भारतात आशा वर्कर हा प्रकल्प भारतातील आरोग्यक्षेत्राला समाजाला जोडणारा दुवा आहे. प्राथमिक आरोग्य सुविधा घरोघरी पोहोचवण्यात आशा वर्करचा मोठा वाटा आहे. कोरोनाकाळातील आशा वर्करंच काम वाखाणण्याजोगं होतं. खुद्द मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी देखील त्यांच्या कामाची दखल घेतली. या आशा वर्करनी केलेल्या कामामुळे कोरोनाशी लढण सोपं झालं होतं. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेकांनी शहरं सोडून गावाची वाट धरली, तेव्हा घरोघरी जाऊन या आशा वर्कर डाटा गोळा करत आरोग्य व्यवस्थेला पोहोचवत होत्या. ज्यामुळे निर्णय घेणं सोप होत होतं. गावात आलेल्या लोकांची विचारपूस करुन कोणाला ताप आहे का? कोणी आजारी आहे का, ताप असेल तर त्यांची माहीती देणं, कोरोना टेस्ट करुन घेणे , आवश्यक उपचार आणि गरज पडली तर अॅडमिट करुन घेणे, घरातील इतर सदस्यांची तपासणी, क्वारंटाईन करणं अशी अनेक काम या आशा वर्कर महामारीच्या काळातही करत होत्या, त्यांच्या धैर्याचं कौतुक झालंच.

जागतिक आरोग्य संघटनेकडून दखल -

जागतिक आरोग्य संघटनेने आशा वर्करच्या धाडसी वृत्ती, निडरपणा आणि नेतृत्वगुणांचं कौतुक करत, ग्लोबल लीडर पुरस्कारासाठी भारतातील आशा वर्करची निवड केलीय. भारतातील आशा वर्कर( Accredited social Health Activist) ची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली.

कोरोना महामारीची सुरुवात ते कोरोना लसीकरण करुन घेणं अशा कामात आशा वर्कर्सनं केलेल्या उत्कृष्ट कामाची ही पोचपावतीच मिळाली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात आशा म्हणून काम करणाऱ्या वैजयंती गव्हाणे आदिवासी पाड्यांवर कोरोनाकाळात काम करत होत्या , आदिवासी भागात काम करणं अतिशय आव्हानात्मक होतं असं त्या सांगतात. कोरोनाकाळात बस बंद होत्या तेव्हा टू व्हीलरवर आणि पुढे डोंगराळ भागात ३ किलोमीटरपर्यत चालत गावागावंत पोहोचत असल्याचं आशा सांगतात. अनेक आशांना त्यांच्या घरातूनच कामासाठी बाहेर पडण्यास विरोध होता, अशा वेळी आशा गटप्रवर्तकची भूमिका महत्वाची ठरलीय. ''ही समाजसेवा , ह्या महामारीला आशाच्या कामानेच अटकाव घालता येईल असी जाणीव त्यांनी इतरांना करुन दिली.

कोरोना काळात आशा वर्कर आणि गटप्रवर्तक घरोघरी जाऊन तपासणी करत होत्या
कोरोना काळात आशा वर्कर आणि गटप्रवर्तक घरोघरी जाऊन तपासणी करत होत्या E sakal

पहिली लाट असताना क्वारंटाईन केलेल्या कुटुंबाला भाजीपाला, किराणा साहित्या पोहोचवण्याचं काम केलं. आदिवासी दुर्गम भागात आम्हाला विरोध झाला. आमच्यात आतापर्यंत कोणीच आजारी पडलेलं नाही. मात्र तुमच्यामुळेच आम्हाला माहामारी होईल अशी समजूत झाल्याने आदिवासींकडून विरोध झाला पण त्यांना समजावून सांगणं, कोरोना लसीकरण करुन घेणं सगळंच आव्हानात्मक होतं,'' असं वैजयंती गव्हाणेंनी सकाळ डिजिटलशी बोलताना सांगत होत्या. बारामतीतील स्वाती धायगुडे या बारामतीतील काटेवाडी येथे आशा गटप्रवर्तकचं काम करतायत. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात लोक घरासमोर उभं राहू देत नव्हते. तसंच सर्व माहीती बाहेर देतायत, आमच्याशी लोक बोलणार नाहीत, आम्हाला वाळीत टाकलं जाईल अशी भीती अनेकांना असायची. घरातूनही या कामाला सुरुवातीला विरोध होता.

पण महामारीला आपल्यापर्यंत पोहोचू द्यायचं नसेत तर हे काम महत्वाचं असल्याचं सांगून कुटूंबियांची समजूत काढल्याचं स्वाती धायगुडे सांगत होत्या. शहरातून गावात येणाऱ्यांना क्वारंटाईन करताना खूप समजवावं लागायचं अनेकदा बोलणी खावी लागली, त्यानंतर मात्र सर्वांनी सहकार्य केल्याचं स्वाती धायगुडे सांगतात. ग्लोबल लीडर पुरस्कार मिळाल्याचा खूप आनंद झालाय. '' मी आशा आहे, मला आशा असण्याचा अभिमान आहे '' असं त्या म्हणाल्या. मात्र हे सर्व असलं तरि अतिशय तुटपूंज्या ंमानधनात काम करावं लागत, आम्हाला उत्तम मानधन आणि सरकारी सेवेत पूर्णवेळ सामावून घ्यावं अशी मागणी असून लवकरचं मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं त्यांनी सकाळ डिजिटलशी बोलताना सांगितलं.

आशा हा प्रकल्प काय?

राज्यभरात ७७ हजार आशा वर्कर काम करतायत. National Rural health mission अंतर्गत ग्रामीण भागात आणि दुर्गम भागात आरोग्यविषयक योजना पोहोचवणं, तसंच गर्भवती महिलेची प्रसूतीपूर्व मार्गदर्शन तसंच लसीकरण याविषयीचं काम त्या करतात. तसंच सुरक्षित प्रसूती, स्तनपान आणि कुटुंबनियोजनासंदर्भात मार्गदर्शन करतात. भारतातील बालमृत्यू आणि मातांचे मृत्यूं प्रमाण कमी करण्यासाठी या प्रकल्पाची सुरुवात झाली होती.

2005 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत आशा वर्कर प्रोजेक्ट सुरु झाला. वय वर्ष २५ ते ४५ दरम्यानच्या महिला यात काम करतात. आशा वर्कर त्या गावची रहीवासी असावी. ती विवाहीत किंवा विधवा अथवा घटस्फोटीत असावी किमान आठवी पर्यंतच शिक्षण झालेलं असावं, काही अपवादात्मक स्थितीत ही अट शिथिल होउ शकते. आशा वर्करमध्ये नेतृत्वगूण असावेत, उत्तम संभाषण कौशल्य असावं, ग्रामसभेद्वारा ३ महिलांची नावं आशा वर्कर पदासाठी दिली जातात, त्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होतं. आशा आणि अंगणवाडी सेविका अनेकदा एकत्र काम करतात. गर्भवती मातांच्या आरोग्याचा प्रश्न असो, की लोहयुक्त गोळ्यांच्या सेवनासाठीचं मार्गदर्शन असो, तसंच टीटी आणि इतर लसीकरणासाठी गर्भवती मातांना सेंटरपर्यंत आणणं हे काम अंगणवाडी सेविकांबरोबर आरोग्य सेवा बालक आणि माता तसंच किशोरींपर्यत पोहोचवण्यात , गावात आरोग्यविषयक जनजागृती करण्यात या दोन्ही घटकांचा मोठा वाटाय.

तूटपूंज मानधन आणि त्रयस्थासारखी वागणूक-

राज्यात 77 हजार आशा स्वयंसेवक काम करतात. त्यांचं कौतुक झालं , जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली. मात्र राज्य सरकार आणि केंद्र सरकार मात्र दखल घेत नसल्याची खंत आशा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलीय. ''आशा स्वयंसेवकांनी जीवाची बाजी लावत कोरोना काळात काम केलंय. त्यांना अतिशय तूंटूपंज मानधन मिळत, कोरोनात जीव धोक्यात घालून, हल्ले पचवत या आशा काम करत होत्या. मात्र याची दखल कोणीच घेतली नाही. राज्यात 77 हजार आशा काम करत होत्या. त्यांना कोणताच मेडीक्लेम नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना त्रयस्थासारखी वागणूक दिली जाते. त्यामुळे आमची मागणी आहे की आशांना कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा. ''मानधन नको तर किमान वेतन असावं'' अशी मागणी महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक संघटनेचे सरचिटणीस श्रीमंत बाबुराव घोडके यांनी केलीय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com