esakal | नियम मोडाल तर पडेल महागात; लग्नमंडपाऐवजी नवरदेवाची पोलीस ठाण्यात वरात

बोलून बातमी शोधा

नियम मोडाल तर पडेल महागात; लग्नमंडपाऐवजी नवरदेवाची पोलीस ठाण्यात वरात

नियम मोडाल तर पडेल महागात; लग्नमंडपाऐवजी नवरदेवाची पोलीस ठाण्यात वरात

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक राज्यांमध्ये लॉकडाउन करण्यात आला आहे. या काळात प्रशासनाने अनेक निर्बंध लावले असून लग्नसोहळेदेखील मोजक्या पाहुण्यांच्याच उपस्थित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, अनेक जण या आदेशांची पायमल्ली करत आहेत. परंतु, नियमांचं उल्लंघन करणं एका वऱ्हाडाला चांगलंच महागात पडलं आहे. थाटामाटात लग्न करायला निघालेल्या एका लग्नात चक्क कलेक्टरांनी हजेरी लावत सध्या वऱ्हाडाची पोलिस स्टेशनमध्ये वरात काढली आहे.

हेही वाचा: आता उन्हाळ्यातही दूध होणार नाही खराब; फॉलो करा ६ टीप्स

सध्या सोशल मीडियावर त्रिपुरा राज्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आगरताळा येथे एका लग्नसोहळ्यामध्ये पाहुण्यांनी मोठी गर्दी केली होती. याविषयी जिल्हाधिकारी शैलेश यादव यांनी माहिती मिळाली आणि ते थेट पोलिसांसह या लग्नसोहळ्यात पोहोचले आणि त्यांनी मास्क न घातलेले वर विनाकारण गर्दी केल्यामुळे वऱ्हाडी व नवरदेवाला चांगलाच चोप दिला.

दरम्यान, रात्री १० नंतर कोणतेही मंगल कार्यालय सुरु ठेवण्यास परवानगी नाही. तरीदेखील हा लग्नसोहळा सुरु होता. त्यातच या सोहळ्यात पाहुण्यांनी गर्दी केली होती.