esakal | आता उन्हाळ्यातही दूध होणार नाही खराब; फॉलो करा ६ टीप्स

बोलून बातमी शोधा

आता उन्हाळ्यातही दूध होणार नाही खराब; फॉलो करा ६ टीप्स

आता उन्हाळ्यातही दूध होणार नाही खराब; फॉलो करा ६ टीप्स

sakal_logo
By
टीम ई सकाळ

प्रत्येकाच्या घरात आवर्जुन सापडणारा पदार्थ म्हणजे दूध. चहा असो वा एखादा गोड पदार्थ. प्रत्येक गोड पदार्थाची चव दुधामुळे द्विगुणित होते. त्यामुळे दुध हे सगळ्यांच्याच घरात कायम असतं. दुधापासून अनेक पदार्थ तयार करता येतात. त्यातच उन्हाळा सुरु झाला की कोल्ड कॉफी, मिल्कशेक असेही पदार्थ हमखास होतात. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारं हे दूध वातावरणामुळे मात्र लवकर खराब होतं. त्यामुळे उन्हाळ्यात अनेकदा दूध नासल्याचं किंवा खराब झाल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे फ्रीजमध्ये ठेवल्यावरनंतरही ते खराब होतं. म्हणूनच आज आम्ही अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे उन्हाळ्यात दोन दिवस सुद्धा दूध आरामात टिकेल व खराब होणार नाही.

१. दूध घेतल्यानंतर सगळ्यात प्रथम ते तापवून घ्या. उन्हाळ्यात कच्च दूध लवकर खराब होतं. त्यामुळे ते तापवणं गरजेचं आहे.

२. दूध ज्या भांड्यात किंवा पातेल्यात गरम करत आहात ते पातेलं अगदी स्वच्छ हवं. जर त्यात साबणाचे डाग किंवा अन्य काही पदार्थांचे डाग असतील तर दूध खराब होऊ शकतं.

हेही वाचा: कोरोना झाल्यानंतर चव आणि वास का जातो?

३. दूध पातेल्यात ओतण्यापूर्वी त्यात थोडंसं पाणी टाकावं. यामुळे दूध पातेल्याला चिकटत नाही आणि सायदेखील (मलाई) भरपूर येते.

४. दूध कायम मध्यम आचेवर तापवावं. दूध खळखळून उकळू लागल्यावर फ्लेम कमी करावी व २-३ मिनिटांसाठी लो फ्लेमवर तापवावं.

५. गरम दूध कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका. दूध गरम झाल्यावर २-३ तास त्याला सामान्य तापमानावर ठेवा. त्यानंतर ते रुम टेमरेचरवर आल्यावर फ्रीजमध्ये ठेवा.

६. दूध दोन दिवसांपर्यंत चांगलं ठेवायचं असेल तर ते दिवसातून २ वेळा तरी तापवा.