esakal | मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरु - राकेश टिकैत
sakal

बोलून बातमी शोधा

Rakesh Tikait

मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरु - राकेश टिकैत

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - तीन कृषी कायद्यांना विरोध करणारे शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकार (Government) शेतकऱ्यांच्या मागण्या (Farmer Demand) मान्य करण्यास तयार नाही. त्यामुळे मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन अशाच प्रकारे सुरू राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. (Agitation will Continue till the Demands are Met Rakesh Tikait)

दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या आंदोलनाची भूमिका सरकारपर्यंत पोचविण्यासाठी टिकैत यांनीही ट्विटरचा आधार घेतला आहे. त्यांनी ट्विट केले की, लोकशाही असलेल्या देशात केंद्र सरकार शेतकऱ्यांबरोबर सहमत होत नाही; पण आमचे आंदोलन यापुढेही सुरूच राहील. २२ जुलै रोजी संसदेबाहेर सनदशीर आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत. येत्या १९ जुलै रोजी अधिवेशन सुरू होत आहे. येत्या २२ जुलैपासून आम्ही देखील संसदेचे कामकाज सुरू असताना संसदेबाहेर आंदोलन करणार आहोत. गेल्या २६ जानेवारी रोजी शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. तसा प्रकार आता होणार नाही. आमचे आंदोलन शांततेच्या मार्गाने चालेल, असे त्यांनी म्हटले आहे.

loading image