‘धक्काबुक्की’वरून निदर्शने; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी राजीनामा देण्याची मागणी

पीटीआय
सोमवार, 30 डिसेंबर 2019

मला प्रियांकांचे कौतुक वाटते. लोकांना गरज असताना त्रास सहन करूनही त्या त्यांच्यापर्यंत पोचल्या. अडचणीत असलेल्या लोकांना भेटण्यात काहीच गुन्हा नाही. महिला पोलिसांची वागणूक मात्र धक्कादायक होती. 
- रॉबर्ट वद्रा

नवी दिल्ली - काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना लखनौ पोलिसांनी धक्काबुक्की केल्याच्या आरोपानंतर काँग्रेसने उत्तर प्रदेश सरकारचा तीव्र निषेध करत आज येथील उत्तर प्रदेश भवनासमोर निदर्शने केली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान अटक झालेले निवृत्त आयपीएस अधिकारी एस. आर. दारापुरी यांच्या लखनौ येथील निवासस्थानी जाणाऱ्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी अडविले. या वेळी महिला पोलिसांनी गळा धरला आणि ढकलून खाली पाडले, असा आरोप प्रियांकांनी केला. पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावला. काँग्रेसने मात्र पोलिसांच्या कृतीचा निषेध केला आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेश भवनासमोर निदर्शने करताना आदित्यनाथ सरकारवर टीका केली. या सरकारने अनेक नेत्यांना अशीच वागणूक दिली असल्याची टीका करण्यात आली. भोपाळमध्येही काँग्रेसकडून आदित्यनाथ यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन केले.

राष्ट्रवादीच्या आमदाराला मोठा झटका; कारखान्याचे संचालकपद रद्द

‘नौटंकी’मुळे मते मिळत नाहीत
लखनौ : प्रियांका गांधी यांची वर्तणूक म्हणजे नौटंकी असून, यामुळे काँग्रेसला मते तर मिळणार नाहीच, पण पक्षही संपून जाईल, असा दावा उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी केला आहे. ‘प्रियांका यांच्या कृतीवरून काँग्रेस पक्ष हा गोंधळ माजविणारा पक्ष असल्याचे सिद्ध होत आहे. शांततापूर्ण वातावरण त्यांना सहनच होत नाही. त्यांना जनतेचे कल्याण नको आहे. मात्र, नौटंकी करूनही त्यांना मते मिळणारच नाहीत,’ असे मौर्य यांनी म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agitation for yogi adityanath resign demand