आंदोलकांनी तिरंगा उंचावल्यानंतर वाचला पोलिसाची जीव!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

अहमदाबादमधील शाह-ए-आलम भागात प्रचंड गोंधळ उडाला होता. या भागात आंदोलकांनी पोलिसांना घेराव घातला होता. यात डीसीपी, एसीपी निरिक्षकांसह 19 पोलिस जखमी झाले.

अहमदाबाद : नागरिकत्त्व सुधारणा विधेयकावरून सारा देश पेटलेला असताना गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका वेगळ्याच घटनेचे दर्शन झाले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यात आंदोलकांनी पोलिसांना घेरले आहे. यात पोलिस स्वतःचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. यावेळी आंदोलकांनीही त्यांना वाचवण्यासाठी जीव लावून प्रयत्न केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

अहमदाबादमधील शाह-ए-आलम भागात प्रचंड गोंधळ उडाला होता. या भागात आंदोलकांनी पोलिसांना घेराव घातला होता. यात डीसीपी, एसीपी निरिक्षकांसह 19 पोलिस जखमी झाले. यातील एक पोलिस गंभीर जखमी आहे. या पोलिसाला आंदोलक मारहाण करत होते, तेव्हा तेथील काही जणांनी तिरंगा उंचावला ज्यामुळे त्या पोलिसाचा जीव वाचला. ज्यावेळी पोलिसांवर दगडफेक होत होती, त्या वेळी इतर तरूणांनी त्यांच्याभोवती साखळी केली व पोलिसांना वाचवले. विशेष म्हणजे हे सर्व तरूण आंदोलक होते. 

अहमदाबादमधल्या हिंसाचारात पोलिसांनी 32 जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. त्याप्रमाणे इतरांनाही ताब्यात घेतले जाईल. 

देशभरात हिंसाचाराच्या घटना : वाचा दिवसभरात कोठे काय घडले!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agitators saved police live while agitation at Ahemdabad