esakal | देशभरात हिंसाचाराच्या घटना : वाचा दिवसभरात कोठे काय घडले!
sakal

बोलून बातमी शोधा

nationwide protest against citizenship act home minister amit shah emergency meeting

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभरात आगडोंब उसळळला आहे. दिल्लीसह लखनौ, अहमदाबाद, बेंगळुरू येथे सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शनं असून, त्याठिकाणी आंदोलक आणि पोलिस यांच्यात संघर्ष झाला आहे. अनेक ठिकाणी पोलिस, पत्रकार आणि आंदोलक जखमी झाले आहेत.

देशभरात हिंसाचाराच्या घटना : वाचा दिवसभरात कोठे काय घडले!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभरात आगडोंब उसळळला आहे. दिल्लीसह लखनौ, अहमदाबाद, बेंगळुरू येथे सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शनं असून, त्याठिकाणी आंदोलक आणि पोलिस यांच्यात संघर्ष झाला आहे. अनेक ठिकाणी पोलिस, पत्रकार आणि आंदोलक जखमी झाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मुंबईत आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात बॉलिवूडमधील सेलिब्रिटीही सहभागी झाले आहेत. तर महाराष्ट्रात नागपूर, सोलापूर, मालेगाव याठिकाणीही नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात तीव्र आंदोलन झाले आहे. या सगळ्या घटनांची दखल घेऊन केंद्रात गृहमंत्री अमित शहा यांनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. लखनौमध्ये उसळलेल्या हिंसाचारावरून केंद्राने चिंताव्यक्त केली असून, अमित शहा यांच्या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, अजित डोभाल, केंद्रीय गृहसचिव अक्षयकुमार भल्ला, गृहराज्यमंत्री किशन रेड्डी आदी प्रमुख उपस्थित आहेत.

राष्ट्रवादीकडून 'या' दोन नेत्यांना विधानपरिषदेचे गिफ्ट

१) लखनौमधील आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तोडफोडीसारख्या छोट्या मोठ्या घटना घडल्या आहेत. एका पोलिसाच्या गाडीलाही आग लावण्यात आली असून गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

२) दिल्लीतही लाल किल्ला आणि काही परिसरात आंदोलने करण्यात आली. आंदोलकांनी केलेल्या प्रदर्शानामुळे राजीव चौक, मंडी हाउस असे २० मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले होते. काही भागातील इंटरनेट आणि एसएमएस सेवाही बंद करण्यात आली आहे.

३) दिल्लीत अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. ज्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (CPM)चे नेते सीताराम येचुरी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI)चे नेते डी. राजा, पटियाला (पंजाब)चे माजी खासदार धरमवीर गांधी, दिल्लीचे माजी खासदार संदीप दीक्षित, स्वराज इंडियाचे संस्थापक अध्यक्ष योगेंद्र यादव, स्वराज इंडियाचे दिल्ली अध्यक्ष कर्नल जयवीर अशा लोकांचा समावेश आहे. 

४) दिल्लीमध्ये AISAअध्यक्ष सुचेता डे, विद्यार्थी नेते उमर खालिद, यूनाइटेड अगेंस्ट हेटचे नेते नदीम खान तसेच, कांग्रेस नेते अजय माकन यांच्या पत्नी यांच्यासोबत अनेक विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, बंगळुरुमध्ये पोलिसांनी इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्यासोबत जवळपास 30 आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

५) बिहारची राजधानी पटनामध्येही नागरिकता विधेयकाचा मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत आहे. दरभंगा शहरात कम्युनिस्ट संघटनांनी रेल्वे रोको केला असून बिहारच्या अन्य काही भागात या कायद्याच्या विरोधात तीव्र आंदोलने सुरु आहेत.

६) गुजरातमधील अहमदाबादमध्येही नागरिकता कायद्याचा मोठा विरोध करण्यात येत आहे. तसेच अहमदाबादच्या काही भागात पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमारही केला आहे. आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनांना अडवत रास्ता रोको केला होता.

७) देशभरात हिंसक आंदोलने चालू असताना गृह मंत्री अमित शहा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक आपत्कालीन बैठक बोलावली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीला गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभालही उपस्थित राहतील.

८) गृह मंत्री अमित शहा यांनी बोलावलेल्या बैठकीला केंद्रीय गृह राज्य मंत्री जी किशन रेड्डी आणि केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला हेही बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बैठकीत देशातील परिस्थितीवर चर्चा केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

९) बुधवारी सायंकाळी प्रशासनाने दिल्ली, लखनऊ आणि बंगळुरूमध्ये आंदोलन करण्याची परवानगी देणे नाकारले होते. परंतु, मुंबई, चेन्नई, पुणे, हैदराबाद, नागपुर, भुवनेश्वर, कोलकाता आणि भोपालमध्ये आंदोलकांवर कुठल्याही प्रकाकरचे निर्बंध लादले नव्हते.

१०) मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानावरही नागरिकता कायद्याच्या विरोधात आंदोलने करण्यात आली. याच कारणावरून मुंबईतील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

loading image