
अग्निपथ वाद : योजनेचे नाव न घेता PM मोदींनी दिला संदेश; म्हणाले...
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अग्निपथ (Agneepath) योजनेवरून देशात वाद सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये हिंसक निदर्शने व जाळपोळही झाली. या योजनेवरून पंतप्रधानांवरही टीका करण्यात आली. असे असताना बेंगळुरूला पोहोचलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजनेचे नाव न घेता तरुणांना मोठा संदेश दिला आहे. आठ वर्षांत केंद्र सरकारने अंतराळ व संरक्षण क्षेत्र तरुणांसाठी खुले केल्याचे नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी म्हटले आहे. (PM Narendra Modi message to youth without naming the Agneepath scheme)
केवळ सुधारणेचा मार्गच नवीन ध्येयांकडे घेऊन जाऊ शकतो. अनेक दशकांपासून सरकारची मक्तेदारी असलेली संरक्षण आणि अवकाश क्षेत्रे आम्ही तरुणांसाठी खुली केली आहेत. ड्रोनपासून ते इतर तंत्रज्ञानापर्यंत आम्ही तरुणांना काम करण्याची संधी देत आहोत. सरकारने जे जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान निर्माण केले आहे. त्यासाठी तरुणांनी कल्पना व इनपुट द्यावेत, असे आम्ही तरुणांना सांगत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
हेही वाचा: काँग्रेस नेत्याची जीभ घसरली; सहाय म्हणाले, मोदी हिटलरप्रमाणे मरतील
उपक्रम सरकारी असो की खाजगी दोन्ही देशाची संपत्ती आहे. त्यामुळे समतल खेळाचे क्षेत्र सर्वांना समान द्यायला हवे यावरही नरेंद्र मोदी यांनी भर दिला. मागच्या आठ वर्षांत १०० अब्ज डॉलरहून अधिक कंपन्या निर्माण झाल्या आहेत. ज्यामध्ये दर महिन्याला नवीन कंपन्या जुडत आहेत. भारत स्टार्ट अप्सच्या जगात वेगाने काम करीत आहे. आतापर्यंत हजारो कोटींचा व्यवसाय केला आहे, असेही नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.
मोदींनी सुमारे २७ हजार कोटींच्या विविध प्रकल्पांना ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यांनी बेंगळुरू उपनगरीय रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी केली. तसेच बीआर आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (BASE) उद्घाटन केले.
हेही वाचा: अग्निवीर भरतीसाठी भारतीय लष्कराकडून अधिसूचना जारी; जुलैपासून नोंदणी
दुहेरी इंजिनचे सरकार रेल्वे, रस्ता, मेट्रो, अंडरपास, उड्डाणपूल, बेंगळुरूमधील जामपासून सुटका करण्यासाठी सर्व शक्य मार्गांवर काम करीत आहे. आमचे सरकार बंगळुरूच्या उपनगरी भागांना चांगल्या कनेक्टिव्हिटीने जोडण्यासाठी वचनबद्ध आहे, असेही पंतप्रधान मोदी (Narendra Modi) म्हणाले.
काही निर्णय सुरुवातीला वाईट वाटतात; मात्र...
काही निर्णय सुरुवातीला वाईट वाटतात. परंतु, त्याचा देशाला दीर्घकाळ फायदा होतो. हे निर्णय राष्ट्र उभारणीत मदत करतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी बेंगळुरू येथील कार्यक्रमात म्हणाले. बिहार, उत्तर प्रदेश, हरयाणा, राजस्थान, मध्यप्रदेशसह देशातील अनेक राज्यांतील युवक या योजनेच्या विरोधात निदर्शने करीत आहेत, हे विशेष...
Web Title: Agneepath Controversy Pm Narendra Modis Message To Youth Without Naming The Scheme
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..