आग्रा (उत्तर प्रदेश) : प्रेमाची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आग्र्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका वडिलांनी आपल्या सुनेवर एकतर्फी प्रेमातून (One Sided love) स्वतःच्याच मुलाचा निर्घृण खून केल्याचं उघड झालंय. इतकंच नव्हे, तर हत्येचा आरोप स्वतःच्या मुलावरच टाकत आत्महत्येचा बनाव केला होता. पोलिसांनी चार महिन्यांच्या तपासानंतर प्रकरणाचा पर्दाफाश केला आणि आरोपी वडील चरण सिंग याला अटक केली.