

Morocco Becomes Important Ally for Modern Farming and Agri Trade
sakal
उत्तर आफ्रिकेतील महत्त्वाचा देश असलेल्या मोरोक्कोने आफ्रिका, युरोप आणि पश्चिम आशिया यांना जोडणारे प्रवेशद्वार म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. विकसित बंदर व्यवस्था, वाहन उद्योग, खतनिर्मिती आणि हरित ऊर्जा क्षेत्रातील प्रगती यामुळे भारतासाठी मोरोक्को हा महत्त्वाचा भागीदार आहे. फॉस्फेटसारख्या नैसर्गिक स्रोतांमुळे भारतीय कृषी क्षेत्रासाठीही हा देश अत्यंत महत्त्वाचा आहे. पर्यटन, बॉलिवूड आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यामुळे दोन्ही देशांमध्ये जनसंपर्कही वाढत आहे.