ऑगस्टा वेस्टलँड : मी कोणाचेही नाव घेतले नाही : मिशेल 

वृत्तसंस्था
शनिवार, 6 एप्रिल 2019

"एपी' आणि "फॅम'चा उल्लेख 
"ईडी'ने गुरुवारी (ता. 4) ख्रिस्तियन मिशेल याच्याविरोधात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात "अहमद पटेल' आणि "श्रीमती गांधी' या नावांचा उल्लेख केल्याचे सांगितले जात आहे. "ईडी'च्या म्हणण्यानुसार चौकशीदरम्यान मिशेलने "एपी' आणि "फॅम'चा उल्लेख केला आहे. यात "एपी'चा अर्थ अहमद पटेल आणि "फॅम' म्हणजे "फॅमिली' असा लावला जात आहे. "ईडी'ला जी डायरी मिळाली आहे; तीत "एपी' आणि "फॅम' हे सांकेतिक भाषेत लिहिलेले आढळले असल्याचा दावा करण्यात येत आहे. 

नवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टरखरेदी गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या चौकशीदरम्यान आपण कोणाचेही नाव घेतले नसल्याचा खुलासा या प्रकरणात अटकेत असलेला मध्यस्थ आरोपी ख्रिस्तियन मिशेल याने शुक्रवारी केला. 

"ईडी'ने काल मिशेलवर पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यानंतर आज मिशेलने खुलासा केला. केंद्र सरकार तपास यंत्रणांचा वापर राजकीय फायद्यासाठी करीत असल्याचा आरोप त्याने केला. या वादग्रस्त खरेदीचे लाभदायी म्हणून पूर्वीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारमधील नेते, लष्करी कर्मचारी व पत्रकारांची नावे "ईडी'ने आरोपपत्रात नमूद केली आहेत. मात्र, याविरोधात मिशेल याने याचिका दाखल केली आहे. त्याचे वकील अल्जो के. जोसेफ यांनी विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांच्या न्यायालयात याचिका सादर केल्यानंतर त्यांनी तपास यंत्रणेला नोटीस बजावली असून, शनिवारपर्यंत (ता. 6) उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच दिवशी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. 

प्रसारमाध्यमांमध्ये काही नावे जाहीर झाली, तरी मिशेल याने चौकशीदरम्यान कोणाचीही नावे सांगितलेली नाहीत. खळबळ माजविणे आणि माझ्या अशिलाविरोधात मत कलुषित करणे, हाच हेतू यामागे असल्याचा आरोप जोसेफ यांनी केला. काल दाखल झालेल्या पुरवणी आरोपपत्राची एक प्रत मिशेलला देण्यापूर्वी माध्यमांना देण्यात आली, असा दावाही त्यांनी केला. आरोपपत्र न्यायालयात सादर होण्यापूर्वीच ते माध्यमांपर्यंत कसे पोचले, असा प्रश्‍नही जोसेफ यांनी केला. 

"एपी' आणि "फॅम'चा उल्लेख 
"ईडी'ने गुरुवारी (ता. 4) ख्रिस्तियन मिशेल याच्याविरोधात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात "अहमद पटेल' आणि "श्रीमती गांधी' या नावांचा उल्लेख केल्याचे सांगितले जात आहे. "ईडी'च्या म्हणण्यानुसार चौकशीदरम्यान मिशेलने "एपी' आणि "फॅम'चा उल्लेख केला आहे. यात "एपी'चा अर्थ अहमद पटेल आणि "फॅम' म्हणजे "फॅमिली' असा लावला जात आहे. "ईडी'ला जी डायरी मिळाली आहे; तीत "एपी' आणि "फॅम' हे सांकेतिक भाषेत लिहिलेले आढळले असल्याचा दावा करण्यात येत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AgustaWestland Case Not Named anyone In Connection With Deal says Christian Michel