
अहमदाबादमध्ये टेकऑफ नंतर विमान कोसळल्याची घटना घडलीय. अहमदाबादहून लंडनला या विमानाने उड्डाण केलं होतं. उड्डाणानंतर काही मिनिटांतच रहिवाशी भागात विमान कोसळलं. या दुर्घटनेनंतर अहमदाबादमध्ये आकाशात धुराचे लोट पसरले होते. घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि बचावपथक दाखल झाले आहेत.