अहमदाबाद बाँबस्फोट: माफीच्या साक्षीदाराने प्रकरणात मुद्दाम गोवलं; तिघांचा दावा

अहमदाबाद बाँबस्फोट: माफीच्या साक्षीदाराने प्रकरणात मुद्दाम गोवलं; तिघांचा दावा
Updated on

अहमदाबाद : माफीच्या साक्षीदाराने वैयक्तिक आकसातून आम्हाला बाँबस्फोटाच्या प्रकरणात गोवले, असा असा आरोप अहमदाबाद साखळी बाँबस्फोट प्रकरणात फाशीच्या शिक्षा झालेल्यांपैकी तिघांनी केला आहे. २००८ मध्ये झालेल्या या बाँबस्फोट प्रकरणी विशेष न्यायालयाने शुक्रवारी (ता. १८) ३८ जणांना फाशी, तर ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. (Ahmedabad blast)

अहमदाबाद बाँबस्फोट: माफीच्या साक्षीदाराने प्रकरणात मुद्दाम गोवलं; तिघांचा दावा
Video: भरसभेत कार्यकर्त्याच्या पाया का पडले PM मोदी? वाचा कारण

या सुनावणीमध्ये मूळ आरोपी आणि नंतर माफीचा साक्षीदार बनलेल्या अयाझ सय्यद याची साक्ष महत्त्वाची ठरली. मात्र, त्याने वैयक्तिक आकस, पूर्वग्रह आणि पंथामध्ये फरक असल्याने जाणूनबुजून आपल्याला अडकविल्याचा आरोप दोषी ठरविलेल्यांपैकी तिघांनी केला आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रतीमध्ये याबाबत माहिती आहे. फाशीची शिक्षा झालेल्यांपैकी शमशुद्दीन सहाबुद्दीन शेख याने सांगितले की, ‘साबरमती तुरुंगात मी आणि अयाझ एकत्र होतो. इंग्रजीवरील प्रभुत्व, कुरआनचा अभ्यास, शैक्षणिक पात्रता याबाबतील मी अयाझपेक्षा सरस असल्याने त्याची चिडचिड होत असे. तसेच, आम्ही दोघे सुन्नी असलो तरी आमच्या पंथामध्ये फरक होता. त्यामुळेच त्याने माझ्याविरोधात चुकीची माहिती दिली.’ इतर दोघांनीही अयाझने दिलेली माहिती चुकीची असल्याचा दावा केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com