
अहमदाबाद : येथील एका खासगी शाळेतील एका विद्यार्थ्याने मंगळवारी दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा चाकूने वार करत खून केल्याचा खळबळजनक प्रकार घडला. या प्रकाराने संतप्त झालेल्या नागरिकांनी बुधवारी सकाळी शाळेच्या खोल्यातील फर्निचरची मोडतोड केली आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली. याप्रकरणी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले असून, शांतता बाळगण्याचे आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केले.