
अहमदाबाद विमान दुर्घटनेत २७४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आतापर्यंत समोर आली आहे. पण यापैकी केवळ ३१ मृतदेहांचीच ओळख पटली असून १९ मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आले आहेत. २४ तास मृतदेहांच्या डीएनए चाचणीचे काम सुरू आहे. केंद्र सरकारकडूनही डीएनए चाचणी करण्यासाठी तज्ज्ञ पाठवण्यात आले आहेत. दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचंही निधन झालंय. अद्याप त्यांच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही.