
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेतील ९९ मृतदेहांची ओळख पटवण्यात यंत्रणांना यश आलं आहे. तर उर्वरित मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा मृतदेह देखील सापडला असून तो त्यांच्या कुटुंबियांकडं सोपवण्यात आला आहे. दरम्यान, तपास अधिकाऱ्यांना कॉकपिट व्हाइस रिकॉर्डर ब्लॅक बॉक्स सापडला आहे. या घटनेचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला फ्लाइट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) सापडला होता. पण आता दोन्ही रिकार्डर सापडल्याने अधिकाऱ्यांना तपास करण्यात मदत मिळणार आहे.