
Unemployment Increased: भारताच्या शहरी आणि ग्रामीण भागात तरुणवर्ग तसेच महिलांच्या बेरोजगारीच्या दरात वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने आज बेरोजगारीच्या दराची ताजी आकडेवारी प्रसिद्ध केली. शहरी तसेच ग्रामीण भागात १५ ते २९ वर्षे वयोगटात बेरोजगारीच्या दरातील वाढ १७ टक्क्यांवर गेली आहे. बेरोजगारीच्या दरात वाढ का झाली, याची कारणे मात्र मंत्रालयाने स्पष्ट केलेली नाहीत.