
Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताचे गूढ आता लवकरच उलगडणार आहे. या अपघातातील ब्लॅक बॉक्सच्या डेटा रिकव्हरीबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. तपासकर्त्यांनी अपघाताग्रस्त एअर इंडिया विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून डेटा यशस्वीपणे रिकव्हर केला आहे. विमानाच्या फ्रंट ब्लॅक बॉक्समधून डेटा प्राप्त करून तो डाउनलोड करण्यात आला असून, मेमरी मॉड्यूललाही यशस्वीरित्या ऍक्सेस करण्यात आले आहे.