
12 जून 2025 रोजी अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणारे एअर इंडियाचे विमान 171 (एआय171) अवघ्या एका मिनिटात कोसळले. या भयंकर अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. विमान रनवे 23 वरून दुपारी 1:39 वाजता (IST) उड्डाण करताच 625 फूट उंचीवर पोहोचलं, पण काही क्षणांतच -475 फूट प्रति मिनिट या वेगाने खाली येऊन एका रुग्णालयाच्या इमारतीवर कोसळलं. या दुर्घटनेत 15 डॉक्टर जखमी झाले असून, 242 प्रवाशांचा जीव धोक्यात आहे.