
गुरुवारी गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या भीषण अपघाताने संपूर्ण जग हादरले. या विमानात एकूण २४२ लोक होते, त्यापैकी २४१ जणांना या अपघातात आपला जीव गमवावा लागला. हा अपघात इतका भीषण होता की विमान आगीचा गोळा बनले आणि त्याचे एका ढिगाऱ्यात रूपांतर झाले. पण या भीषण अपघातात विश्वास कुमार रमेश हा एकमेव प्रवासी आश्चर्यकारकरित्या बचावला आहे हा एक चमत्कारच मानला जात आहे. तर दुसरा चमत्कार असा की, विमानात भगवद्गीता या ग्रंथ सापडला ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे कारण अख्खं विमान जळून खाक झाले असूनही हा ग्रंथ पूर्णपणे सुरक्षित राहिला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.