
अहमदाबाद विमान दुर्घटनेतील एअर इंडियाचं विमान AI 171च्या अवशेषांमधून ब्लॅक बॉक्ससह आणखी २९ मृतदेह बाहेर काढण्यात आले. भारताच्या इतिहासातली ही सर्वात भीषण अशी विमान दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेत आतापर्यंत २७४ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. पोलिसांनी सांगितले की, दुर्घटनेच्या २८ तासांनंतर ब्लॅक बॉक्स सापडला आहे. बीजे मेडिकल कॉलेजच्या मेस बिल्डिंगच्या छतावर ब्लॅक बॉक्स पडला होता. तर विमानाचं इमर्जन्सी लोकेशन ट्रान्समिटर गुरुवारी रात्रीच सापडलं होतं.