
अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. रुपाणी यांचा डीएनए जुळला असून त्यांचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपावला जाणार आहे. विजय रुपाणी यांच्यावर राजकोटमध्ये अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी यांनी दिली.