
प्रेमात धोका मिळाल्यानंतर एका तरुणीने असा कारनामा केला की त्यामुळे १२ राज्यातले पोलीस, गुप्तचर यंत्रणा आणि शेकडो सुरक्षा रक्षकांसह हजारो नागरिकांना त्रास सहन करावा लागला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमसह १२ राज्यात २१ पेक्षा जास्त वेळा बॉम्बच्या खोट्या धमक्या देण्यात आल्या. या प्रकरणी पोलिसांनी चेन्नईतून तरुणीला अटक केलीय. रेने जोशिल्डा असं तिचं नाव असून रोबोटिक्समध्ये इंजिनिअरिंग झालंय. चेन्नईतील एका एमएनसीमध्ये ती मोठ्या पदावर काम करतेय. एअर इंडियाचं विमान क्रॅश झाल्यानंतर तिनं प्रियकराच्या नावानं ईमेल केल्यानंतर खळबळ उडाली होती. प्रियकरानेच विमान पाडलं असा दावा त्या ईमेलमध्ये केला होता.