
Ahmedabad plane crash: अहमदाबाद विमान अपघातामध्ये २४२ प्रवाशांपैकी केवळ एकाचा जीव वाचला आहे. केवळ एका मिनिटामध्ये झालेल्या या अपघातात विश्वास कुमार रमेश नेमका कसा वाचला, हे त्यानेच सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथे जाऊन जखमींची विचारपासू केली. विश्वास कुमार रमेश याच्याशीही पंतप्रधानांनी संवाद साधला. विश्वास कुमार रमेश जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.