
गुरुवार, १२ जून २०२५ हा दिवस गुजरातसह संपूर्ण देशासाठी एक काळा दिवस ठरला. अहमदाबाद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया विमानाच्या दुर्घटनेने देशभरात शोककळा पसरली आहे. या अपघातात २६५ प्रवाशांचा मृत्यू झाला, ज्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, या तारखेचा आणि त्यांच्या आवडत्या ‘१२०६’ क्रमांकाशी एक विचित्र योग जोडला गेला आहे, जो आता सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.