
१२ जून २०२५ हा दिवस सगळ्यांसाठी मोठी दुःखाची बातमी घेऊन आला. गुजरात येथील अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरलाय. या अपघाताची भीषणता प्रचंड होती. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टेक ऑफ करताना एअर इंडियाचं प्रवासी विमान AI171 मेघानी नगर परिसरात कोसळलं. या विमानात २४२ प्रवासी आणि १० कर्मचारी होते. यात लहान मुले आणि स्त्रियांचा देखील समावेश होता. या प्रवाशांमध्ये ५३ ब्रिटिश नागरिक देखील होते. त्यातील २ ब्रिटिश नागरिकांचा मरणापूर्वीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.