
गुरुवार, १२ जून रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं लंडनकडे जाणारं विमान कोसळून भीषण दुर्घटना घडली, ज्यात २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचाही समावेश असून, ते आपल्या मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते. त्यांच्या मुलीला भेटण्याची त्यांची शेवटची इच्छा अपूर्णच राहिली. या दुर्घटनेने संपूर्ण देश हळहळला असून, यापूर्वीही गुजरातचे माजी मुख्यमंत्री बलवंत राय मेहता यांचा पाकिस्तानच्या हल्ल्यात विमान अपघातात मृत्यू झाल्याची आठवण अनेकांनी व्यक्त केली आहे. इतिहासात अशा घटनांची पुनरावृत्ती होणं अत्यंत वेदनादायक ठरत आहे.