नातेवाईकाकडूनच घात, विवाहितेवर वारंवार बलात्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rape

नातेवाईकाकडूनच घात, विवाहितेवर वारंवार बलात्कार

अहमदाबाद: नातेवाईकानेच (Relative) एका ३८ वर्षीय महिलेचं अपहरण (Abduct) करुन तिच्यावर वारंवार बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना गुजरातच्या अहमदाबाद शहरात घडली आहे. पीडित महिलेने (Victim women) कशीबशी नराधमाच्या तावडीतून स्वत:ची सुटका करुन तिथून पळ काढला व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पीडित महिला शेहरकोतडाची रहिवाशी असून तिचं लग्न झालं आहे. तिला चार मुलं आहेत.

"पीडित महिलेच्या नवऱ्याला कायस्वरुपी नोकरी नाही. आरोपी दूरचा नातेवाईक आहे. त्याने महिलेला आर्थिक मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. कुटुंबाला आर्थिक चणचणीतून बाहेर काढण्याचं त्याने आश्वासन दिलं होतं" असं पोलिसांनी सांगितलं. आरोपीने लग्न करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळेच आठ वर्षाच्या मुलीसोबत घर सोडलं, असा दावा पीडित महिलेनं केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

हेही वाचा: मलिकांना उत्तर, समीर वानखेडेंचे पूजेचे फोटो आले समोर

आरोपी आधीपासूनच विवाहित असल्याचं आपल्याला नंतर कळलं, असं पीडित महिलेनं सांगितलं. "आरोपी नातेवाईकाने महिलेचं अपहरण करुन तिला अबू येथे घेऊन गेला. तिथे तिला एका खोलीत कोंडून ठेवलं व वारंवार तिच्यावर बलात्कार केला. एक दिवस तिला संधी मिळाली व महिला तिथून निसटण्यात यशस्वी ठरली. कशीबशी पीडित महिला अहमदाबाद येथे पोहोचली व तिने पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार नोंदवली" पोलिसांनी ही माहिती दिली. पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी विशेष टीम्स बनवल्या आहेत.

loading image
go to top