मलिकांना उत्तर, समीर वानखेडेंचे पूजेचे फोटो आले समोर| Sameer wankhede | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मलिकांना उत्तर, समीर वानखेडेंचे पूजेचे फोटो आले समोर

मलिकांना उत्तर, समीर वानखेडेंचे पूजेचे फोटो आले समोर

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab malik) सातत्याने NCB मुंबईचे झोनल संचालक समीर वानखेडे (Sameer wankhede) यांना लक्ष्य करत आहेत. समीर वानखेडे यांच्या व्यक्तीगत आयुष्यापासून ते त्यांच्या धर्मापर्यंत अनेक बाबी नवाब मलिक यांनी उघड केल्या आहेत. आज नवाब मलिक यांनी एक नवीन फोटो टि्वट केला आहे. “कबूल है, कबूल है, कबूल है… यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?”, असं कॅप्शन नवाब मलिक यांनी दिलं आहे. हा फोटो समीर वानखेडेंच्या निकाहच्या वेळेचा असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडे यांच्यावर असे व्यक्तीगत स्वरुपाचे हल्ले सुरु असताना, आता ज्ञानदेव वानखेडे यांनी समीर वानखेडे हिंदू धर्माचे पालन करत असल्याचे काही फोटो शेअर केले आहेत. समीर वानखेडे हे मुस्लिम असून त्यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे आरक्षणाअंतर्गत आयआरएसमध्ये नोकरी मिळवल्याचा मलिक यांचा आरोप आहे. आपण मुस्लिम नसून हिंदू आहोत, असं वानखेडे कुटुंबीयांचं म्हणणं आहे. या प्रकरणी कोर्टात खटला देखील सुरु आहे.

हेही वाचा: प्रेमासाठी कायपण! पत्नीसाठी बांधलं हुबेहूब ताज महालासारखं घर

नवाब मलिकांनी टि्वट केला फोटो

“कबूल है, कबूल है, कबूल है… यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?”, अशा कॅप्शनसहीत मलिक यांनी हा फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये डावीकडे बसलेली व्यक्ती ही समीर वानखेडे आहेत. त्यांच्यासमोर मुस्लीम धर्मगुरु बसल्याचे दिसत आहे. वानखेडे हे निकाहनाम्यावर स्वाक्षरी करत असल्याचे या फोटोत दिसत आहे.

loading image
go to top