

Challan Shows Location in Atlantic Ocean
Esakal
वाहतुकीचे नियम मोडले तर दंडाची पावती फाडावी लागते. वेग मर्यादा ओलांडल्यास, गाडीची कागदपत्रे नसल्यास, चुकीच्या बाजूने गाडी चालवल्यास दंड केला जातो. आता एका वाहनधारकाने त्याला झालेल्या दंडाची पावती शेअर करत वाहतूक विभागाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला आहे. एक्सप्रेस वेवर गाडी चालवत असताना दंडाच्या पावतीवर लोकेशन मात्र चक्क अटलांटिक महासागरातलं दाखवण्यात आलंय. सध्या सोशल मीडियावर या दंडाच्या पावतीचा फोटो व्हायरल होत आहे.