Tirupati Temple: तिरुपतीला भाविकांच्या गर्दीवर ‘एआय’चे लक्ष; मुख्यमंत्री नायडू यांच्या हस्ते उद्घाटन
Temple Innovation: आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून एकीकृत सूचना आणि नियंत्रण केंद्राचे (आयसीसीसी) उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे भाविकांची गर्दी नियंत्रित करणे, रांगेतील वेग वाढविणे आणि सुरक्षिततेसाठी उपाय योजणे शक्य होणार आहे.
तिरुपती : आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून भाविकांसाठी एकीकृत सूचना आणि नियंत्रण केंद्राचे (आयसीसीसी) उद्घाटन मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू यांच्या हस्ते गुरुवारी झाले.