
नवी दिल्ली : ‘‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचे संशोधन केवळ महाराष्ट्रातील उस शेतीपुरतेच मर्यादित नसून ते देशातील सर्व प्रकारची पिके, फळबागायती आणि भाजीपाल्यांसाठी त्याचा उपयोग होणार आहे. देशातील शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान सर्व भाषांमध्ये उपलब्ध असेल. या तंत्रज्ञानाच्या साह्याने शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न ५० हजार ते अडीच लाखादरम्यान वाढू शकते,’’ अशी ग्वाही बारामतीच्या कृषी विकास ट्रस्टचे विश्वस्त आणि ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी आज येथे दिली.