भाजप तमिळनाडूचे राजकारण बदलू शकत नाही;अण्णाद्रमुकच्या बैठकीत सूर

भाजप तमिळनाडूचे राजकारण बदलू शकत नाही;अण्णाद्रमुकच्या बैठकीत सूर

चेन्नई - तमिळनाडूतील राजकारण भाजप बदलू शकत नाही आणि मतदारांत फूट पाडू शकत नाही. विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर अण्णाद्रमुक पक्ष भाजपला सत्तेपासून दूरही ठेवू शकते, असा सूर आज अण्णाद्रमुकच्या बैठकीत निघाला. विधानसभा निवडणूक जिंकण्याचा विश्‍वास यावेळी बैठकीत व्यक्त करण्यात आला. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भाजप आणि अण्णाद्रमुक यांची आघाडी २०२१ च्या विधानसभा निवडणुकीची तयारी करत असताना आज अण्णाद्रमुकच्या बैठकीत आम्हीच मोठे भाऊ अशा प्रकारचे सूर निघाले. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून पलानीस्वामी यांच्या नावाला भाजपने पाठिंबा द्यावा तसेच अन्य अटी देखील मान्य कराव्यात, असे पक्ष नेत्यांचे म्हणणे होते. या अटी म्हणजे जसे की सरकारमध्ये सहभाग असेलच असे नाही. जर भाजपला सरकारमध्ये घ्यायचे नसेल तर अण्णाद्रमुकच्या नेत्यांनी अन्य पर्यायाचा विचार करावा, असे सांगण्यात आले. अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललिता आणि द्रमुकचे नेते एम. करुणानिधी यांचे निधन झाल्याने दक्षिण भारतातील राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. याचा संदर्भ घेत अण्णाद्रमुकचे उप सहायक के. पी मुनुसामी म्हणाले की, यासारख्या दिग्गज नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे अनेक पक्ष तमिळनाडूत राजकीय शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि राजकीय वारसा चालवण्यास इच्छुक आहेत. काही राजकीय पक्ष संधीसाधू, विश्‍वासघातकी आणि गर्दी गोळा करणारे आहेत. त्यांनी द्रविड संघटनांवर आरोप करत तमिळनाडूला पन्नास वर्षाच्या राजवटीत पिछाडीवर नेले, असे आरोप केले आहेत. विशेष म्हणजे अण्णाद्रमुक सरकारने तमिळनाडूत केलेल्या विविध विकासकामाबद्धल सरकारकडून अनेक पुरस्कार दिले जात असताना केंद्रातील पक्षांकडून अशा प्रकारचे आरोप कसे होऊ शकतात, याबाबत मुनुसामी यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. तमिळनाडूने पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही आघाडी घेतली असल्याचेही ते म्हणाले. राजकीय फायदा उचलणाऱ्या पक्षांना तमिळनाडूत थारा मिळणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. द्रविड विचारसरणी ही राज्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाचा आधार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पलानीसामी यांचा आरोप 
दरम्यान, २०१९ ची लोकसभा निवडणूक द्रमुकच्या नेत्यांनी मतदारांना खोटे बोलून जिंकली होती, असा आरोप मुख्यमंत्री पलानीसामी यांनी केला आहे. परंतु विधानसभा निवडणूक लोकसभेपेक्षा वेगळी असते. त्यामुळे आगामी निवडणुकीत द्रमुक पक्षाचा पराभव निश्‍चित आहे. २०२१ ची निवडणूक अण्णाद्रमुकच निर्विवादपणे जिंकेल, असा विश्‍वास पलानीसामी यांनी व्यक्त केला. दरम्यान, पुढील वर्षी पश्‍चिम बंगालप्रमाणेच तमिळनाडूत विधानसभा निवडणूक होत आहे. अण्णाद्रमुक आणि द्रमुक यांच्यात काटे की टक्कर होणार आहे. तसेच भाजप देखील आपले अस्तित्व दाखवण्यासाठी बाजी पणाला लावणार आहे. दुसरीकडे सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हसन देखील मैदानात उतरणार आहेत. या दोघांनीही पक्षाची घोषणा केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com