Effects of Air pollution: हवा प्रदूषणामुळे कर्करोग होऊ शकतो? AIIMS चे डॉक्टर म्हणाले की...

हवा प्रदूषणाचे लोकांच्या आरोग्यावर होणारे घातक परिणाम: AIIMS चे डॉक्टर म्हणाले की...
aiims doctor can  air pollution  cause cancer effects human health delhi air pollution
aiims doctor can air pollution cause cancer effects human health delhi air pollution Esakal

देशात दिल्ली, कोलकाता, मुंबई या शहरांचा समावेश जगातील सर्वाधिक प्रदूषित हवा असलेल्या शहरांमध्ये् झाला आहे. यातचं दिल्ली-एनसीआरमधील हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा मागील काही दिवसांपासून 'गंभीर' श्रेणीत आहे. रविवारी दिल्ली हे जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होते. येथील लोकांना श्वास घेणेही कठीण झाले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे श्वास घेण्यास त्रास होणे आणि डोळ्यात जळजळ होण्याच्या तक्रारी लोक करत आहेत. हे पाहता, हवा प्रदूषणाचे लोकांच्या आरोग्यावर होणारे घातक परिणाम डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले आहेत.

हवा प्रदूषणामुळे कर्करोगाचा धोका?

एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, डॉ. पीयूष रंजन (अतिरिक्त प्राध्यापक, वैद्यक विभाग, एम्स) यांनीANI शी बोलताना माहिती दिली की, वायू प्रदूषण आणि विविध प्रकारचे कर्करोग यांच्यातील संबंध स्थापित करणारे वैज्ञानिक पुरावे अस्तित्वात आहे. श्वसनसंस्थेला हानी पोहोचवण्याबरोबरच हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक यांसारख्या कोरोनरी धमनी रोगांशीही वायुप्रदूषणाचा थेट संबंध असल्याचे त्यांनी सांगितले.

एम्सचे डॉक्टर म्हणाले की, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की श्वसनाच्या आजारांव्यतिरिक्त, वायू प्रदूषणाचा शरीराच्या विविध प्रणालींवरही परिणाम होतो. प्रदूषणाचा हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक आणि संधिवात यांसारख्या रोगांशी थेट संबंध आहे. आमच्याकडे वैज्ञानिक पुरावे आहेत जे विविध प्रकारच्या कर्करोगाशी त्याचा संबंध प्रस्थापित करतात.

aiims doctor can  air pollution  cause cancer effects human health delhi air pollution
Delhi Air Pollution : दिल्ली-NCR मध्ये प्रदूषणाचा कहर! विषारी हवेत श्वास घेणंही झालं कठीण

आरोग्यविषयक तज्ज्ञांनी हवेच्या प्रदूषणामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात असा इशारा दिला असून, गर्भावर होणाऱ्या दुष्परिणामांचा इशाराही दिला आहे. डॉक्टरांच्या मते, वायू प्रदूषण हे सावधगिरीचे उपाय न केल्यास मेंदू आणि हृदयाला नुकसान पोहोचवते आणि सर्व वयोगटांमध्ये याचे दुष्परिणाम पोहचू शकतात.

दिल्लीत हवेची गुणवत्ता रविवारी आज देखील गंभीर स्तरावर होती. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कुठल्याही निरोगी व्यक्तीसाठी एअर क्वालिटी इंडेक्स ५० हून कमी असणे आवश्यक आहे. मात्र या काळात तो ४०० हून अधिक झाला आहे. यामुळे फुफ्फुसांसंबंधित आजारांनी ग्रस्त लोकांसाठी ही धोक्याची घंटा आहे. यामुळे फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याचा धोका देखील वाढू शकतो.

aiims doctor can  air pollution  cause cancer effects human health delhi air pollution
Weather Update: पुन्हा रेनकोट, छत्र्या बाहेर काढा; कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता, काय आहे हवामान विभागाचा अंदाज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com