Asaduddin Owaisi: "इस्लाममध्ये विवाह एक करार तर हिंदू धर्मात जन्मोजन्मीची साथ, तुम्ही..." ; ओवैसींचा मोदींना सवाल

Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisi
Updated on

Asaduddin Owaisi : समान नागरी कायद्याबद्दल (Uniform Civil Code) लोक चुकीच्या अफवा पसरवत आहेत. एका कुटुंबामध्ये प्रत्येकासाठी वेगवेगळे नियम असतील, तर ते कुटुंब पुढे कसे जाईल? देशात समान नागरी कायदा लागू व्हावा यासाठी सर्वोच्च न्यायालय प्रयत्न करत आहे. मात्र, व्होट बँकसाठी काही लोक या कायद्याला विरोध करत आहेत, असे नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.  ते मध्य प्रदेशात बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) पाच वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवला. यानंतर त्यांनी मेरा बूथ-सबसे मजबूत या कार्यक्रमात लोकांना संबोधित केले. मोदी यांनी समान नागरी कायद्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी टीका केली आहे. त्यांनी मोदींना देखील काही सवाल केले आहेत.

असदुद्दीन ओवैसी म्हणाले, कलम 29 हा मूलभूत अधिकार आहे हे पंतप्रधानांनी समजून घेतले पाहिजे, मला वाटते पंतप्रधानांना हे समजले नाही. संविधानात धर्मनिरपेक्षतेची व्याख्या आहे. इस्लाममध्ये विवाह हा एक करार आहे, तर हिंदू धर्मात जन्मोजन्मीची साथ आहे. तुम्ही हे सर्व एकत्र करणार का? ते (नरेंद्र मोदी) भारताच्या विविधतेला एक समस्या मानतात.

Asaduddin Owaisi
Madras High Court : मंदिरातील पुजाऱ्यांची नियुक्ती जातीच्या आधारावर नाहीच! हायकोर्टाची महत्वपूर्ण टिप्पणी

पंतप्रधानांचे पाकिस्तानवर इतके प्रेम का? त्यांनी त्यांच्या विचाराचे सॉफ्टवेअर बदलायला हवे. भारतीय मुस्लिमांचा पाकिस्तान, इजिप्तशी काय संबंध? तुम्ही त्यांना कमी लेखत आहात आणि कमी लेखता आहात? हे तर देशाविरोधात आहे, असे ओवैसी म्हणाले.

Asaduddin Owaisi
PM Modi on UCC : एका घरात दोन कायदे असतात का? समान नागरी कायद्यासाठी मोदींनी दिले बांगलादेशचे उदाहरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com