MIM: 'कोणी माय का लाल मला..' भर सभेत अकबरुद्दीन ओवैसींची पोलिसांना धमकी, FIR दाखल

एआयएमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी कर्तव्यावर असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याला धमकवल्याचा प्रकार समोर आला आहे.
AIMIM leader Akbaruddin Owaisi threatened a police inspector on duty asked him to leave the spot while he was addressing campaign knp94
AIMIM leader Akbaruddin Owaisi threatened a police inspector on duty asked him to leave the spot while he was addressing campaign knp94

तेलंगणा- एआयएमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी कर्तव्यावर असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याला धमकवल्याचा प्रकार समोर आला आहे. अकबरुद्दीन हैद्राबादमधील ललितबाग येथे सभेला संबोधित करत होते. यावेळी पोलिस अधिकाऱ्याने त्यांना नियमानुसार सभा वेळेत संपवण्याच्या सूचना दिल्या. यावेळी ओवैसी यांनी पोलिसाला धमकावत सभेचे स्थळ सोडण्यास सांगितलं. याप्रकरणी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलाय.

एएनआयने यासंदर्भातील बातमी दिली आहे. एआयएमआयएमचे प्रमुख अससुद्दीन ओवैसी यांनीही याप्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. वेळ जर रात्री १० वाजून ०१ झाली असती तर तुम्हाला थांबवण्याचा पूर्ण अधिकार होता. पण, पाच मिनिट शिल्लक असताना त्यांना रोखण्यात आलं. एखादा व्यक्ती पाच मिनिटांत खूप काही बोलू शकतो. भाषण संपवतानाचं वक्तव्य देखील महत्त्वाचं असतं, असं ओवैसी म्हणालेत.

AIMIM leader Akbaruddin Owaisi threatened a police inspector on duty asked him to leave the spot while he was addressing campaign knp94
Asaduddin Owaisi Video : ''त्यांना माझी सावलीही नकोय...'' देशभरातील विरोधकांच्या आघाडीवर ओवैसी बरसले

अकबरुद्धीन काय म्हणाले?

माझ्याकडे घड्याळ आहे. मला वेळ कळतोय. त्यामुळे तुम्ही येथून निघून जा. बंदुक, चाकूचा उल्लेख झाला म्हणून कमजोर झालो असं समजू नका, माझ्यात अजून खूप हिंमत आहे. त्यामुळे मी पाच मिनिट बोलणार. कोणी माय का लाल मला थांबवू शकत नाही. अकबरुद्दीनला हरवू शकत नाही, म्हणून असे प्यादे आणले जात आहे. बघुया कोण जिंकतंय, असं ते म्हणाले होते.

एफआयआर दाखल

पोलिसांना धमकी दिल्याप्रकरणी आमदार अकबरुद्दीन यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान पोलिसांना भरसभेत धमकी दिल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. अकबरुद्दीन यांच्याविरोधात कलम ३५३, १५३ (a), ५०६ , ५०५(२) आणि आरपी अॅक्ट कलम १२५ अंतर्गत संतोषनगर पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आलाय.

AIMIM leader Akbaruddin Owaisi threatened a police inspector on duty asked him to leave the spot while he was addressing campaign knp94
UCC: "मुस्लिमांना धडा शिकवण्याच्या नादात देशाचं होणार नुकसान"; ओवैसी पहिल्यांदाच बोलले

याआधीही वादग्रस्त वक्तव्य

अकबरुद्दीन ओवैसी हे कायम आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी एका सभेदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतरही त्यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. सध्या तेलगणांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभांचा धडाका सुरु आहे. राजकीय पक्षांकडून मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com