
Indian Air Force
Sakal
हिंडन : आॅपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलाने शत्रूच्या ठिकाणांचा अचूक वेध घेत केलेल्या धाडसी कारवाईमुळे, हवाई दल हे योग्यवेळी आक्रमकपणे कारवाई करण्यास सक्षम असल्याचा आत्मविश्वास पुन्हा एकदा देशाच्या मनात निर्माण झाला, असे प्रतिपादन हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंग यांनी बुधवारी केले. ९३ व्या हवाई दल दिनानिमित्त उत्तर प्रदेशातील हिंडन हवाई तळावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.